Dada Bhuse | “राऊत ‘मातोश्री’ची भाकरी खातात अन् राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात”- दादा भुसे

Dada Bhuse | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याचे पडसाद विधानसभेत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे ‘मातोश्री’ची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात, असं दादा भुसे म्हणाले आहेत.

दादा भुसे यांची संजय राऊतांवर टीका

संजय राऊत यांच्या आरोपांवर दाद भुसे चांगलेच संतापले. त्यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर टीका करताना दादा भुसे यांनी केली आहे. “आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही”, असे दादा भुसे म्हणाले आहेत.

Dada Bhuse criticize Sanjay Raut

संजय राऊत सोमवारी (20 मार्च) रात्री त्यांनी कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले. दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sanjay Raut’s Tweet

“शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल”, असे संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.