‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते लीलाधर सावंत पडद्याआड

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच काल 21 ऑक्टोबर रोजी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दीर्घ आजारांने ग्रस्त होते. त्यांनी वाशिमच्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

“लीलाधर यांच्या दोन बायपास सर्जरी झाल्या असून त्यांना दोनदा ब्रेन हॅमरेजचे अटॅक आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारांवर सर्व पैसे खर्च झाले आहे. आता लीलाधर यांना बोलणंही शक्य होत नाही.” असं त्यांच्या पत्नी पुष्पा यांनी सांगितलं. तसेच त्यांनी बिकट परिस्तिथी असल्यामुळे कलाकारांना मदत देखील मागितली आहे.

लीलाधर सावंत यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी १७०हून जास्त चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शनचे काम केलं आहे. लीलाधर यांनी तब्बल २५ वर्ष काम केले. त्यात त्यांनी ‘सागर’, ‘हत्या’, ‘१००डेज’, ‘दिवाना’, ‘हद कर दी आपने’ अशा चित्रपटांना कला दिग्दर्शन केलं होतं. दादासाहेब फाळकेसोबतच त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि माणिकचंद पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा