दहीहंडी म्हणजे काही स्वातंत्र्ययुद्ध नाही; राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सवावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दहीहंडी साजरी करण्यावरुन मनसे आणि भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.या निर्बंधांमुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. यात ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी राज म्हणाले कि, सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाचे संकट दिसत असतांना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत, जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. हे खुप दुर्देवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, हे ही त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
हा जनतेच्या जीविताचा प्रश्न आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला लगावलाय.
महत्वाच्या बातम्या
- “अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?”आण्णांच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
- काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही, दहीहंडीवरुन संजय राऊतांची मनसेवर अप्रत्यक्ष टीका
- ‘तो फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्यादिवशी त्याची सर्व बोटे छाटली जातील’; राज ठाकरे आक्रमक
- ‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- ‘…म्हणून सांगतो चड्डीत राहायचं’; नितेश राणेंचा पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल