InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दलित शब्द अपमानस्पद नाही; रिपाइंं करणार सुप्रीम कोर्टात जाणार

दलित शब्दाच्या वापरास मनाई करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं आठवलेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. अनुसूचित जाती आणि जमाती असे शब्द सरकारी कामकाजात आधीपासूनच वापरले जात आहेत. त्यामुळे दलित शब्दाचा वापर सुरूच ठेवावा असं आम्हाला वाटतं. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपला पक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असं आठवले म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.