InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे नुकसान

- Advertisement -

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पपईच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती शासनाला देऊनही अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

अवकाळी आणि गारपिटीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील पत्रे उडून गेली असून शेतकऱ्यांचे केेळीचे व पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळकी गावातील ज्ञानोबा कदम व गुलाब कदम यांच्यासह अनेकांचे पपई आणि केळीचे नुकसान झाले आहे. कदम कुटुंबियांचे साधारणतः ३५० पपईच्या झाडांचे अवकाळी आणि गारपिटीच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी तहसिल कार्यालय व कृषी विभागाला याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. पपईच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पत्रात नमुद करूनही अद्याप कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही, कोणी पंचनामाही केला नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी शासनावर केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.