मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. यातच बॉलिवूड मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीलाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

‘दिलबर… दिलबर…’ या सुपरहिट गाण्यासह अनेक चित्रपट गाण्यांमध्ये डान्स करताना दिसणारी नोरा आता कोरोना संसर्गाच्या विळख्यात अडकली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर तिने स्वतःला घरात क्वारंटाईन केले आहे. असं नोरा फतेहीच्या प्रवक्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

‘नोरा फतेही 28 डिसेंबर रोजी झालेल्या तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आली आहे. नोरा कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल पाळत आहे आणि या अंतर्गत तिने डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्वतःला क्वारंटाईन केले आहे. सुरक्षा आणि सतर्कतेच्या दृष्टीने नियमानुसार, ती BMC ला पूर्ण सहकार्य करत आहेत.’

 

महत्वाच्या बातम्या