Dantewada Naxal Attack : छत्तीसगडमध्ये झालेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद

Dantewada Naxal Attack | छत्तीसगड : आज (26 एप्रिल ) ला छत्तीसगडमधील दंतेवाडा या ठिकाणी नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. तर नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या हल्ल्यातील आयडीच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. तर शहीद झालेल्यांमध्ये 10 डीआरजी (District Reserve Guard) जवान आहेत, तर एक चालक आहे. स्फोटानंतर तो परिसर सील करण्यात आला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सीआरपीएफचे जवान पाठवण्यात आले आहेत.

तसचं ही घटना दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे की, हे जवान मोहीमेवरुन परतत असताना जवानांवर हल्ला आहे. तर दंतेवाडा परिसरात नक्षलवादी असल्याची माहिती जवानांना आधीच मिळाली होती. यामुळे डीआरजी टीम शोध मोहिमेसाठी रवाना झाली होती. शोध मोहीम पूर्ण करून हे पथक परतत असताना नक्षलवाद्यांनी परतीच्या मार्गावर आयईडी टाकून स्फोट केला. यामुळे संपूर्ण भारतवासीयांसाठी ही दुःखाची बातमी आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी देखील मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधून घडलेल्या प्रकारची माहिती घेत हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, भूपेंद्रसिंह बघेल म्हणाले, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. हा लढा शेवटच्या टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू” तर गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-