Dark Circles | डोळ्याखालील डाग सर्कल्स काढायचे असतील, तर बटाट्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Circles | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. कारण स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच सुंदर आणि आकर्षक चेहरा हवा असतो. मात्र, अनेकदा डोळ्याखालील काळी वर्तुळे (डार्क सर्कल्स) तुमच्या सौंदर्यावर परिणाम करतात. अनियमित जीवनशैली आणि पोषक आहाराच्या कमतरतेमुळे डोळ्याखाली डार्क सर्कल्स यायला लागतात. त्याचबरोबर पुरेशी झोप न मिळाल्यामुळे देखील डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ शकतात. ही काळे वर्तुळे काढण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. परंतु, या रासायनिक उत्पादनांमुळे चेहऱ्यांना हानी पोहोचण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतींचा अवलंब करू शकतात. चेहऱ्यावरील डाग सर्कल्स कमी करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकतात. बटाट्याचा पुढील पद्धतीने वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग सर्कल कमी होण्यास मदत होऊ शकते.

बटाट्याचे तुकडे

डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या तुकड्यांचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला बटाटा स्वच्छ धुवून सोलून घ्यावा लागेल. त्यानंतर त्याचे पातळ काप करावे लागेल. हे काप तुम्हाला थंड होण्यासाठी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवावे लागेल. थोड्या वेळाने हे काप फ्रिजमधून काढून डोळ्याखाली किमान 20 मिनिटे ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचे डोळे थंड पाण्याने धुवावे लागतील. नियमित या पद्धतीचा वापर केल्याने डोळ्याखालील काळ्या वर्तुळाची समस्या कमी होऊ शकते.

बटाट्याचा रस

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाट्याचा रस हा सर्वात सोपा पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला एक बटाटा सोलून तो व्यवस्थित किसून घ्यावा लागेल. त्यानंतर त्यातून बटाट्याचा रस काढून घ्यावा लागेल. बटाट्याच्या रसामध्ये तुम्हाला एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेले हे मिश्रण काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर कापसाच्या बोळ्याने ते डोळ्याखाली लावावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला वीस मिनिटे डोळ्यांवर राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे थंड पाण्याने धुवावे लागतील. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होऊ शकतात.

बटाटे आणि टोमॅटो

डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटा आणि टोमॅटोचा वापर उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन चमचे बटाट्याच्या रसामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला ते डार्क सर्कल्सवर लावावे लागेल. वीस मिनिटे हे मिश्रण डोळ्यावर ठेवल्यावर तुम्हाला तुमचे डोळे सामान्य पाण्याने धुवावे लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने डोळ्याखालील काळ्या वर्तुळाची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या