Dasara Melava | “हिंदुह्रदयसम्राट मैद्याचं पोतं कुणाला म्हणायचे?” ; शहाजी पाटलांचा शरद पवारांवर हल्लाबोल
मुंबई : राज्यात राजकीय पारा चढला आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा सुरू आहे, तर एकनाथ शिंदे गटाकडूनही बीकेसी मैदानावर मेळावा सुरू आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सभेत शहाजीबापू पाटील यांनी घणाघात केला. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत शहाजीबापू पाटील यांनी टीका केली.
शहाजीबापू पाटील म्हणाले, “त्या उद्धव ठाकरेला दाखावा खरी शिवसेना कोणती आहे. इथं येऊन बघ म्हणा खरी शिवसेना कळेल. हे भगवे वादळ तुम्ही बघितले तर खरी शिवसेनेचा दाखला तुम्हाला मिळेल.”
शरद पवार यांच्यावर घणाघात-
यावेळी शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील घणाघात केला. “बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणायचे, बारामतीच्या म्हमद्या कुणाला म्हटले, दाऊदचा हस्तक कुणाला म्हटले, इलायती सोनिया गांधी मला चालणार नाही, असे कोण म्हटले बाळासाहेब ठाकरे म्हटले”, असे पाटील म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे दोन तुकडे केले-
“अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे दोन तुकडे केले. रक्ताने वारसदार असल्याने तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबातील घटक म्हणून आजही आम्ही तुमचा सन्मान करतो”, असे देखील पाटील म्हणाले.
शहाजीबापू पाटील म्हणाले, “मेलेल्या कुत्र्याला फरफटत उकिरड्यावर टाकतात, तसं तुम्ही सगळ्या आमदारांना फरफटत नेलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उकिरड्यावर आम्हाला फेकून दिलं. हे उद्धव ठाकरेंनी केलेलं पाप आहे. ते पाप खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंनी धुतलं. एकनाथ शिंदेंनी गद्दारी केलेली नाही. झालेल्या चुकीचं प्रायश्चित घेण्यासाठी धाडसाने उचलेलं एक पाऊल आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Eknath shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांची खुर्ची ; बाजूला उभे राहणार चरणसिंग थापा
- Shahajibapu Patil | “त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि…”, शहाजीबापू पाटलांचा एकेरी उल्लेख करत घणाघात
- Dasara Melava । आदित्य ठाकरेंच्या ज्ञानाची किव येते; बीकेसीतून पावसकरांचा हल्लाबोल
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला जाणाऱ्या लोकांना माहीतीच नाही ते कुठे चालले
- CM Eknath Shinde | दसरा मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदेंचं ट्विट, म्हणाले…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.