तारीख पे तारीख ! कर्जहप्ते वसुली ,बँकांच्या चक्रवाढ व्याजावर आजही सुप्रीम कोर्टात तोडगा नाही !!

पुण्यातील विजय दुब्बल यांनी ऍड असीम सरोदे यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लघु व मध्यम आर्थिक वर्गातील छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून कर्जमाफी करावी अशी मागणी केली होती. मात्र कर्जहप्ते वसुलीला स्थगिती आणि त्यावर बँकांनी आकारलेले चक्रवाढ व्याज यावर आज सोमवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत कोणताही तोडगा निघाला नाही.पुढील सुनावणीसाठी आता केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला या प्रकरणी व्यापक कृती आराखडा सादर करावा लागणार आहे.१३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

दरम्यान दोन कोटींपर्यंतच्या कर्जांवरील चक्रवाढ व्याज माफ करण्याची तयारी केंद्र सरकारकडून दर्शवण्यात आली आहे. मात्र इतर मुद्द्यांवर सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश अशोक भूषण , न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी आणि न्यायाधीश एम. आर शहा यांनी सरकारचे मुद्दे ऐकून घेतले.यावेळी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर  शंका उपस्थित केली. 

थकीत हप्त्यांवर व्याज वसूल करावे का? याबाबत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. हा पेच किचकट असल्याने सध्यातरी मुदत वाढ करण्याबाबत प्रस्ताव स्वीकारावा, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणी दरम्यान केली होती. त्यानुसार खंडपीठाने सोमवारी ५ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती.

एका अहवालानुसार ईएमआय मोरॅटोरियमचा मार्च ते ऑगस्ट या कालावधीत व्याजाची रक्कम ५००० ते ६००० कोटींच्या आसपास असेल असा अंदाज आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज आणि क्रेडीट कार्डची थकबाकी असलेल्या लाखो कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.