InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मोदी पुन्हा सत्तेत आल्याचा दाऊद इब्रहिमने घेतला धसका

- Advertisement -

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याने धसका घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दाऊदने पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. यंदाच्या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले. त्यामुळे दाऊदला मोठा धक्का बसला. या निकालानंतर दाऊदने तात्काळ ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याविषयी चिंता व्यक्त केली.

या बैठकीत त्यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दाऊदने नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता आणि भारताची अमेरिका व इस्रायलशी वाढत असलेली जवळीक याविषयी चिंता व्यक्त केली. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारने दाऊदभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली होती. दाऊदची संपत्ती जप्त करण्याबरोबरच त्याच्या अनेक साथीदारांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला होता. या सगळ्यामुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊदची प्रचंड कोंडी झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दाऊद यंदाच्या निवडणुकीत सत्तापालट होईल, याकडे डोळे लावून बसला होता.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.