23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत सीपीसीएल, बीपीसीएल सांघांचा विजय

पुणे |  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत सीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 31-17 असा पराभव केला. बीपीसीएल संघाने एमआरपीएल संघाचा 28-19 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन फेरीत सीपीसीएल संघाने ईआयएल संघाचा 32-17 असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. सीपीसीएल संघाच्या पेरा रसनने 8 चढायांमध्ये 6 गुण मिळवले तर वासूदेवन याने 10 चढायांमध्ये 8 गुण मिळवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला.

जानकीरामन याने कौशल्यपुर्ण पकडी करत ईआयएल संघाचे मनोबल खच्ची केले व मध्यंतरानंतर ईआयएल संघाला ऑल आऊट करून लोन चढवले.  सीपीसीएल संघाने सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा राखत मध्यांतरापुर्वी 17-10 अशी आघाडी घेतली व सामन्याच्या शेवटीपर्यंत ती टीकवून ठेवत संघाला 32-17 असा विजय मिळवून दिला.

Loading...

दुस-या लढतीत बीपीसीएल संघाने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत एमआरपीएल संघाचा 28-19 असा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. बीपीसीएल संघाने सुरूवातीपासून आक्रमक खेळ करत मध्यंतरापुर्वी 21-7 अशी भक्कम आघाडी घेतली व एमआरपीएल संघाने मनोबल खच्ची केले. बीपीसीएल संघाच्या दिपचंद सिंगने 10 चढायांमध्ये 9 गुण मिळवून संघाचा डाव भक्कम केला. निलेश शिंदेने आपल्या लैकीकाला साजेशी कामगिरी करत सर्वाधिक पकडी केल्या व संघाला 28-19 असा विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबिन फेरी

सीपीसीएल वि.वि ईआयएल – 32-17(17-10 मध्यांतरापुर्वी)

बीपीसीएल वि.वि एमआरपीएल – 28-19 (21-7 मध्यांतरापुर्वी)

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.