InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आज रिशांक देवाडिगाच्या बीपीसीएल संघाची एमआरपीएलशी लढत

पुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल आज २ सामने होणार आहे. 

त्यात संध्याकाळी ४ वाजता सीपीसीएल विरुद्ध ईआयएल असा पहिला सामना होणार असुन दुसरा सामना बीपीसीएल विरुद्ध एमआरपीएल असा ५ वाजता रंगणार आहे. 

बीपीसीएलच्या संघाचा रिशांक देवाडिगा कर्णधार असुन निलेश शिंदे, विशाल माने, नितीन मदने, गिरीष एर्नाक, काशिलींग अडके आणि रोहीत राणा सारखे स्टार खेळाडू आहेत. 

हे सामने पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे काल अर्थात  दि.२० फेब्रुवारी रोजी सुरू झाली असुन २४ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. 

काल 23व्या आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल, एमआरपीएल संघांची विजयी सलामी

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल संघाने सीपीसीएल संघाचा 23-15 तर एमआरपीएल संघाने ईआयएल संघाचा 30-12 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबीन फेरीत  सामन्याच्या पहिल्या सत्रात बीपीसीएल व सीपीसीएल या दोन्ही संघांनी एकमेकांची ताकद आजमावत सावध व संथ खेळ करत असतानाही भक्कम आघाडी मिळवत मध्यंतरापुर्वी 16-6 अशी आघाडी घेतली.

मध्यंतरानंतर बीपीसीएल संघाच्या काशिलिंग अडके व महेंद्र राऊत यांनी त्यांच्या लौकीकाला साजेल अशा चढाया करत संघांच्या गुणांमध्ये झपाट्याने वाढ केली. सीपीसीएल संघाच्या पेरा रसन व दयालन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

बीपीसीएल संघाच्या संघाच्या विशाल मानेने उत्कृष्ट पकडी करत सीपीसीएल संघाचा 23-15 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. 

या सामन्यात बीपीसीएलचा रिषांक देवडीगा दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळू शकला नाही. 

दुस-या लढतीत एमआरपीएल संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा राखत इआयएल संघाचा 30-12 असा एकतर्फी पराभव करत सहज विजय मिळवला. मध्यंतरापुर्वी एमआरपीएल संघाने 15-4 अशी भक्कम आघाडी मिळवली. स्टिव्हन व दिपक यांनी आक्रमक चढाया करत संघाला 30-12 असा सहज विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबीन फेरी

बीपीसीएल वि.वि सीपीसीएल-23-15(16-6 मध्यांतरापुर्वी)

एमआरपीएल वि.वि ईआयएल– 30-12(15-4 मध्यांतरापुर्वी)

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.