InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

नथुराम गोडसेबाबत वक्तव्य केल्याने कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी

अभिनेता कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुर येथे प्रचार करताना नथुराम गोडसेबद्दल बोलताना, ‘नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता,’  असे वक्तव्य केले होते. आता या वक्तव्यानंतर कमल हसन यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

अखिल भारतीय हिंदू महासभेने हसन यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी या कमल हसन यांच्या वक्तव्याने ऐन निवडणुकीत नवा वाद निर्माण झाला आहे. भाजप-शिवसेनेकडून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.