InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत वाद; नामदेव भगत रंगनाथ औटीच्या श्रीमुखात भडकावली

- Advertisement -

महापालिकेच्या स्थायी समितीच्या टक्केवारी वरून शिवसेनेच्या दोन नगरसेवकांत जुंपली. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी आपल्याच पक्षाचे नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या श्रीमुखात लगावल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

स्थायी समितीच्या वसुलीवरून हा वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थायी समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे, तरी समितीची आर्थिक वसुली ही शिवसेनेचे दोन नगरसेवक करीत होते. अशाच ऐका कामाच्या टक्केवारीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने नामदेव भगत यांनी थेट रंगनाथ औटी यांच्या श्रीमुखात भडकावली. या घडल्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे यांनी रंगनाथ औटी यांची समजूत काढल्याचे समजते. पक्षाची बदनामी होऊ नये, यासाठी हे प्रकरणाला मूठमाती देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.