InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘दुष्काळी परिस्थितीवर येत्या 48 तासात निर्णय घ्या’

कोरड्या पात्रातील गाळ हा “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत काढून तो शेतजमिनींसाठी वापरावा. पाऊस सुरू होण्यापूर्वी शक्‍यतो मे महिन्यातच याबाबतीत गतीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब 48 तासांच्या आत निर्णय घ्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी “ऑडिओ ब्रीज सिस्टम’द्वारे या जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाइलवरून थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, वेल्हे, दौंड, इंदापूर, बारामती, शिरुर तालुक्‍यांमधील सुमारे 30 सरपंचांशी त्यांनी चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.