सर्वोच्च न्यायालयात कलम 370 चा निर्णय आज होणार

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्याला आव्हान देणाऱ्या 8 याचिका ात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सोमवारी ात सुनावणी होणार आहे. ात ज्या याचिकांवर सुनावणी होणार आहे त्यात राज्यातून कलम 370 हटवल्याबद्दल, राष्ट्रपती राजवटीची वैधता आणि तिथं लादण्यात आलेली बंधनं यांचा समावेश आहे. या याचिकांमध्ये एक याचिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचीसुद्धा आहे.

काश्मीर संदर्भातील या सर्व याचिकांची सुनावणी सरन्यायाधिश रंजन गोगोई आणि न्यायाधीश एस.ए. बोबडे आणि अब्दुल नजीर यांचे पीठ करणार आहे. जम्मू आणि काश्मीर पीपल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख सज्जाद लोन यांनीही सर्वोच्च न्यायालयात धावा घेतली होती. त्यांनी राज्यातील कलम 370 हटवण्याला आव्हान दिलं होतं. याशिवाय बालहक्क कार्यकर्ती इनाक्षी गांगुली आणि प्राध्यापक शांता सिन्हा यांनी कलम 370 हटवल्यानंतर मुलांना घरांमध्ये कैद केल्याबद्दल याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.