Deepak Kesarkar | “आधी तुमच्या घरात लागलेली आग विझवा” ; दीपक केसरकरांचा अजित पवारांवर पलटवार

Deepak Kesarkar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराचा पहिला दिवस आज संपन्न झाला. या संपूर्ण दिवसात पक्षाच्या तमाम नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना अनेक नामांकित वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही, असं म्हणत शिंदे गटावर हल्ला केला होता. या टीकेला दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे.

“सरकार आणणे सरकार कोसळवणे हेच अजित पवार यांचे काम आहे. जनतेसाठी काम करणं हे आमचं काम आहे. अजित पवार यांनी आमचाही मान ठेवावा. ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्ती बाबत बोलत आहेत. आमच्या व अजित पवार यांच्या वागण्यामध्ये फरक आहे. तुमच्या घरात लागलेली आग आधी विझवा. अजित पवार काय बोलले याकडे शिवसैनिकांनी फारस महत्व देण्याची गरज नाही. कारण यापूर्वी अजित पवार व त्यांच्या पक्षाने चार वेळा शिवसेना फोडली आहे आणि ज्यावेळी तुम्ही काँग्रेससोडून नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा तुम्हाला हे वाक्य आठवलं नाही का?”, असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला.

केंद्राशी भांडून कोणीच मोठं झालेलं नाही-

दीपक केसरकर म्हणाले, “विरोधी पक्ष नेते अजित पवार अडीच वर्षे सत्तेत होते. आम्हाला तीन महिने झाले आहेत. हे खोट बोललं जातं आहे. टाटाचा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरात मध्ये प्रस्तावित होता. त्यांना मनपसंत जागा मिळाल्यानंतर तो प्रकल्प तिकडे गेला. यशवंतराव चव्हाण यांनी अनेक मोठे-मोठे कारखाने उभारले त्यावेळी कोणी का बोललं नाही. वेदांता प्रकल्प जाणार हे तुमच्या उद्योग मंत्र्यांना माहीत होते. त्यांनी दहा महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. केंद्राशी भांडून कोणीच मोठं झालेलं नाही. अडीच वर्षे केंद्राशी कोण भांडत होत, याचा विचार युवकांनी केला पाहिजे केवळ कोणीतरी भडकवल म्हणून त्यांनी वाहत जाऊ नये.”

अजित पवार काय म्हणाले होते –

सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत. ते नेते तसे बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. जनतेचा एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड राग आहे. बच्चू कडू यांनी एका वाहिनीवर मुलाखतीत मुख्यमंत्री म्हणून पद मिळवले ते ठीक आहे, परंतु पक्षावर दावा करणे योग्य नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. राक्षसी महत्त्वकांक्षा योग्य नाही, असं म्हणत पवारांनी शिंदेंवर टीकाही केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; हे खरं असलं तरी राज्य शासन आणि न्यायालयांनीही त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षित असते. मला वाटतं की, निवडणुका लांबविणे ही सध्याच्या शिंदे सरकारची गरज झाली आहे. त्यांना जनाधार नाही. लोकांची सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय त्यांची चूकही त्यांना उमगली आहे; पण ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही. सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.