Deepak Kesarkar | “गल्लीत फिरणे म्हणजे…”; आदित्य ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर

Deepak Kesarkar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंळवारी वरळीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावरून शिवसेनेचे युवानेते आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘दोघांनाही निवडणुकीच्या वेळी वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार’, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“गल्लीत फिरायचं असेल तर आमची हरकत नाही”

“ज्यावेळी वरळीतील लोक न्याय मागत होते, त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळे हे लोकं मुख्यमंत्र्यांकडे आले आणि मुख्यमंत्र्यांनी पैशांची काळजी न करता कोळी बांधवांना व्यावसायासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल कोळी बांधवांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार घेतला. त्याला जर आदित्य ठाकरे गल्लीत फिरणं म्हणत असतील तर आमची काही हरकत नाही”, असं प्रत्युत्तर दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

“गल्ल्यांबाबत कमीपणा वाटून घ्यायचं कारण नाही”

“मी वरळीतील प्रत्येक गल्लीत मोटरसायकलने फिरलो आहे. कारण तिथे गाड्या जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत आम्ही कोळी वाड्यांसाठी इलेक्ट्रीकल दुचाकी मंजूर केल्या आहेत. त्यामुळे वयस्कर लोकांना पायी जाण्याऐवजी या दुचाकांचा वापर करता येतो. त्यामुळे या गल्ल्यांबाबत कमीपणा वाटून घेण्याचं कोणतंही कारण नाही. गल्लीत राहणाऱ्या कोळी बांधवांचा आम्हाला अभिमान आहे”, असेही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“आदित्य ठाकरे मत मिळावी म्हणून कोळी महोत्सवाला जातात. मात्र, याच कोळी बांधवांना कायमस्वरुपीचा रोजगार आम्ही देतो आहे. केवळ वरळीच नाही, तर संपूर्ण मुंबईची सेवा करण्याचे आमचं ध्येय आहे. ही सेवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत असताना आदित्य ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहे”, अशी प्रतिक्रियाही दीपक केसरकर दिली आहे.

“वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार”(Aaditya Thackeray Criticize CM Eknath shinde)

“कितीही नेते येऊदे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार”, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.