Deepak Kesarkar | “दोन दिवसांनंतर अवघ्या महाराष्ट्राला समजेल की खोके कोणी घेतले अन्…”, दीपक केसरकरांचा इशारा
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केला आणि सत्तेत आले. यानंतर शिंदे गटातील नेत्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक नेत्यांनी गद्दार आणि खोके म्हणून वारंवार सुनावलं गेलं. याच टीकेला बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी या टीकेला प्रत्युत्तर केलं आहे.
अवघ्या दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेईल आणि यानंतर संपुर्ण महाराष्ट्राला कळेल चांगलं कोण आहे आणि वाईट कोणं आहे ते, खोके कोण घेतं आणि विचारासाठी कोण लढतं, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तसेच धनुष्यबाण हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हालाच मिळणार असा दावा देखील त्यांनी केला आहे.
प्रत्येक वेळी आमच्यावर आरोप करणं योग्य नाही. आम्ही तर फक्त बाळासाहेबांचे जे विचार आहेत, ज्या पंरंपरा आहेत त्या पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहोत, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधक सतत सत्ताधारकांवर आरोप करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे.
यादरम्यान, भास्कर जाधवांना कोकणात त्यांना बिनकामाचा बैल म्हणतात, ते एक कार्टून आहेत आम्ही त्यांना बैल म्हणतो असं म्हणत येत्या सोमवारी चिपळूण मध्ये सभा घेऊन भास्कर जाधव यांची पोलखोल करणार, असा इशारा निलेश राणेंनी दिला आहे. शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करतं आहे, कोण खुश कोण ना खुश यावर राष्ट्रवादीचे लक्ष आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस बेरोजगार झाली का? सतत सरकारच्या कामावर बोलणं योग्य नाही, जयंत पाटील काहीही बोलत असतात, हवेत गोळीबार करत असतात, असं निलेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrkant Patil | “शिंदे गटातील काही आमदार नाराज”; अजित पवारांच्या विधानाला चंद्रकात पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- Nilesh Rane | भास्कर जाधव बिनकामाचा बैल तर जयंत पाटलांचा हवेत गोळीबार – निलेश राणेंची टीकेची तोफ
- ओ वाचवा…वाचवा..! ड्रायव्हर त्रास देतोय ! पुण्यात बसमध्ये प्रवाशाचा गोंधळ ; VIDEO व्हायरल
- APJ Abdul Kalam Birth Anniversary | ‘अयशस्वी म्हणजे अपयश नाही’ असा संदेश देणारे, डॉ. अब्दुल कलाम यांची आज जयंती
- Shalini Thackeray | ‘कांदे बाई’ उल्लेख करत शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.