Deepak Kesarkar | “बाळासाहेबांची खिल्ली उडवणाऱ्या…” ; दीपक केसरकरांचा सुषमा अंधारेंवर जोरदार पलटवार
Deepak Kesarkar | मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर यांच्यांवर सुषमा अंधारे चौफेर फटकेबाजी करत आहेत. जळगावात बोलताना त्यांनी शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांची नक्कल केली होती, याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दीपक केसरकर म्हणाले, “बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललेलं उद्धव ठाकरे विसरले असतील.परंतु जर शिवसैनिक विसरला तर मी त्याला शिवसैनिक म्हणणार नाही. त्यांची वाक्ये बघा, त्यांच्या वयाचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यांच्या थरथरत्या हाताचा उल्लेख केला. बाळासाहेब तलवार पेलू शकत नाही, असा उल्लेख त्यांनी केला होता. बाळासाहेबांबद्दल माझं एकतरी स्टेटमेंट दाखवलं तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होईन.”
“बाळासाहेबांची खिल्ली उडवणाऱ्या, हिंदू देव देवतांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. त्यांची बॅकग्राउंड काय आहे हे लोकांनी समजली पाहिजे. माझं सर्वस्व पणाला लावून मी लोकांसाठी लढाया लढल्या आहेत. माझी खिल्ली का उडवता? मी उद्धव साहेबांचा आदर करतो. त्यांच्या प्रवक्त्या माझ्याबद्दल बोलत असतील तर याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचा इतिहास त्यांना माहिती नाही. त्यांना चांगलं बोलता येतं, त्यांना लोकांची मिमिक्री करता येते,” असे दीपक केसरकर म्हणाले.
अजित पवारांवर देखील केली टीका –
“सरकार आणणे सरकार कोसळवण हेच अजित पवार यांचे काम आहे. जनतेसाठी काम करणं हे आमचं काम आहे. अजित पवार यांनी आमचाही मान ठेवावा. ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्ती बाबत बोलत आहेत. आमच्या व अजित पवार यांच्या वागण्यामध्ये फरक आहे. तुमच्या घरात लागलेली आग आधी विझवा अजित पवार काय बोलले या कडे शिवसैनिकांनी फारस महत्व देण्याची गरज नाही. कारण यापूर्वी अजित पवार व त्यांच्या पक्षाने चार वेळा शिवसेना फोडली आहे आणि ज्यावेळी तुम्ही काँग्रेससोडून नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा तुम्हाला हे वाक्य आठवलं नाही का?”, असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला. ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणे ही बेईमानी आहे आणि ती जनतेला पटलेली नाही, असं म्हणत अजित पवार यांनी शिंदे गटावर हल्ला केला होता.
केंद्राशी भांडून कोणीच मोठं झालेलं नाही-
दीपक केसरकर म्हणाले, “विरोधी पक्ष नेते अजित पवार अडीच वर्षे सत्तेत होते. आम्हाला तीन महिने झाले आहेत. हे खोट बोललं जातं आहे. टाटाचा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरात मध्ये प्रस्तावित होता. त्यांना मनपसंत जागा मिळाल्यानंतर तो प्रकल्प तिकडे गेला. यशवंतराव चव्हाण यांनी अनेक मोठे-मोठे कारखाने उभारले त्यावेळी कोणी का बोललं नाही. वेदांता प्रकल्प जाणार हे तुमच्या उद्योग मंत्र्यांना माहीत होते. त्यांनी दहा महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. केंद्राशी भांडून कोणीच मोठं झालेलं नाही. अडीच वर्षे केंद्राशी कोण भांडत होत, याचा विचार युवकांनी केला पाहिजे केवळ कोणीतरी भडकवल म्हणून त्यांनी वाहत जाऊ नये.”
महत्वाच्या बातम्या :
- Tulsi Vivah 2022 | आज पासून सुरू होत आहे तुळशी विवाहाचा मुहूर्त, जाणून घ्या शुभ मुहूर्त
- MS Dhoni | … म्हणून महेंद्र सिंग धोनीने उच्च न्यायालयात घेतली धाव
- Sushma Andhare | राज ठाकरेंवर तुम्ही गुन्हे दाखल केले का? ; सुषमा अंधारेंचा सवाल
- Sushma Andhare | भाषणाला परवानगी नाकारल्यामुळे, सुषमा अंधारे घेणार थेट कोर्टात धाव
- Weather Update | ‘या’ राज्यांना पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.