Deepak Kesarkar | बेजबाबदार, बेलगाम किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | कोल्हापूर: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना घेरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर दीपक केसरकर यांनी टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत ज्याप्रमाणे बोलतात त्याप्रमाणे आदित्य ठाकरे बोलत आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

They should not leave the limits of speech – Deepak Kesarkar

दीपक केसरकर म्हणाले (Deepak Kesarkar), “बेजबाबदार, बेलगाम किती बोलावे याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे आदित्य ठाकरे. संजय राऊत (Sanjay Raut) ज्याप्रमाणे काहीही बोलतात त्याप्रमाणेच आदित्य ठाकरे बोलत आहे. त्यांनी बोलण्याच्या मर्यादा सोडू नये, नाहीतर आम्हाला देखील बंधन मुक्त होऊन बोलावं लागेल. ते ज्या पद्धतीने खोटे आरोप करत आहे, ते महाराष्ट्राच्या परंपरेला न शोभणारे आहे.”

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात नावा वाद सुरू झाला आहे. दीपक केसरकर यांच्यासह आशिष शेलार (Deepak Kesarkar) यांनी देखील आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

दरम्यान, आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. यानिमित्तानं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी कोल्हापुरात लोकराजाला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.’

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CNMJDK