Deepak Kesarkar | “सकाळचा शपथविधी घेणारेच आता…”, दीपक केसरकरांचा अजित पवारांवर पलटवार
Deepak Kesarkar | मुंबई : काही महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाज पक्षासोबत युती केली आणि महाविकास आगाडीला सरकारवरुन पायउतार केलं. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या रंगल्या. अशातच राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल भाजप (BJP) राष्ट्रवादी फोडणार का?, या प्रश्नावर विधान केलं होतं. यावर आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पलटवार केला आहे.
सरकार आणणं, सरकार कोसळवणं हेच अजित पवार यांचे काम असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. जनतेसाठी काम करणं हे आमचं काम आहे. अजित पवार यांनी आमचाही मान ठेवावा. ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्तीबाबत बोलत आहेत. आमच्या आणि अजित दादांच्या वागण्यामध्ये फरक आहे, असा घणाघात केसरकरांनी केला आहे.
यादरम्यान, अजितदादा अडीज वर्षे सत्तेत होते. आम्हाला तीन महिने झाले आहेत. हे खोट बोललं जातं आहे. टाटाचा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरातमध्येच प्रस्तावित होता. त्यांना मनपसंत जागा मिळाल्यानंतर तो प्रकल्प तिकडे गेला, असं स्पष्टीकरण देखील दीपक केसरकरांनी दिलं आहे. तसेच राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी अनेक मोठमोठे कारखाने उभारले. त्यावेळी कोणी का बोललं नाही?, असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, तुमच्या घरात आग लागली, आधी ती विजवा, अजित दादा काय बोलले याकडे शिवसैनिकांनी फारसं महत्त्व देण्याची गरज नाही. कारण यापूर्वी अजित पवार व त्यांच्या पक्षाने चार वेळा शिवसेना फोडलीय आणि ज्यावेळी तुम्ही काँग्रेस सोडून नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा तुम्हाला हे वाक्य आठवले नाहीत का?, असा टोला दीपक केसरकरांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे चोरवाट ; अजित पवारांचा शिंदे गटाला
- Amol Mitkari | “रवी राणा यांना जिल्हाबंदी का केली नाही?”; अमोल मिटकरी यांचा खोचक सवाल
- Ajit Pawar | “सध्या सरकारचा ‘रेटून बोल पण खोटं बोल’ हा धंदा..”; अजित पवारांची सडकून टीका
- Amol Mitkari | “पुढच्या आषाढी एकादशीला मविआचा मुख्यमंत्री…”;अमोल मिटकरींचं मोठं विधान
- Winter Hair Care | ‘या’ टिप्स फॉलो करून हिवाळ्यात केस गळतीची समस्या करा दूर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.