Deepak Kesarkar । दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या निश्चित होतात – दीपक केसरकर
Deepak Kesarkar । मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. त्यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या संध्याकाळी राजभवनात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत संकेत दिले होते. राजभवणात तयारी देखील सुरु असल्याची माहिती आहे. यावेळी 15 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. याबाबत आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर म्हणाले कि, मला ज्या प्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल अस सांगितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाच विस्तार होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, असंही ते सांगितलं.
दरम्यान, मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sunil Raut | संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपासून तोडण्याचा प्रयत्न सुरु – सुनील राऊत
- Kirit Somaiya | ४ नेते जेलात ५ वा लाईनीत – किरीट सोमय्या
- Varsha Raut : पती-पत्नीची एकत्र चौकशी होणार?; संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स
- Sanjay Raut | “खिडकी नसलेल्या खोलीत ठेवले” ; संजय राऊतांची न्यायाधीशांकडे तक्रार, ED ने मागितली माफी
- China vs Taiwan | चीनचे तैवानविरोधात शक्तिप्रदर्शन; युद्धनौका आणि क्षेपणास्त्रे घेऊन लष्करी सराव सुरु
Comments are closed.