Deepak Kesarkar | अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार – दीपक केसरकर

Deepak Kesarkar | पुणे : सध्या राजकीय वर्तुळात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion) आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत 20 मे ते 25 मे पर्यंत कधीही होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं परंतु अजून देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट भूमिका पाहायला मिळत नाही. तर याच मंत्रिमंडळ विस्ताराबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विचारला असता त्यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तसचं आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल देखील भाष्य केलं.

Deepak Kesarkar Commented On Cabinet expansion

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “अधिवेशनाच्या आधी 100 टक्के मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसचं मंत्रीपद वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadnavis) ठरवतील”. असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. केसरकरांच्या या विधनावर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचं असल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर देखील भाष्य केलं. भाजप (BJP) आणि शिवसेना ( Shivsena) याचं आधीपासूनच आगामी निवडणूकीच्या जागावाटप बाबत ठरलेलं आहे. भाजप केंद्रात काम करते यामुळे त्यांना आमच्यापेक्षा अधिकच जागा असणार आहे. शिवसेना राज्यात काम करते यामुळे ज्या खी जागा आमच्या आहेत याबाबत आम्ही तयारी करत आहोत. तसचं इतर पक्ष ज्या पध्दतीने तयारी करत आहेत तशी आम्ही देखील आमच्या हक्काच्या जगासाठी प्रयत्न करत आहोत. असं दीपक केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IIGK6t