Deepak Kesarkar | “मग तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणू का?”; पवारांच्या वक्तव्यावर केसरकरांचा सवाल

Deepak Kesarkar | शिर्डी : आज पुण्यातील कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) चिमटे काढले आहेत. ‘कसब्याच्या निकालावरून देशात बदलाचा मूड असल्याचं स्पष्ट होतंय. लोकांना चेंज हवा आहे हे या निकालातून दिसून आलं आहे’, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यावरुन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Deepak Kesarkar Criticize on Sharad Pawar

“कसब्याच्या निकालावरून जर देशात बदलाचा मूड आहे असं समजायचं तर मग चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला. मग बारामतीची तुमची सीट जाईल असं म्हणायचं का?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी शरद पवार यांना केला आहे. दीपक केसरकर हे शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.

“मग तुमची बारामतीची सीट जाईल असं म्हणू का?”

“पिंपरी-चिंचवडचा काही भाग बारामती मतदारसंघाचा भाग आहे. मग तुमची बारामतीची सीट जाईल असे आम्ही म्हणू का? पिंपर-चिंचवड बालेकिल्ला असताना तुम्ही का हारला याचे आत्मपरीक्षण करा. कासब्यातील नाराजीचा फायदा तुम्हाला मिळाला. रवींद्र धंगेकर सातत्याने जनतेत होते म्हणू निवडून आले”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. कासब्याच्या निकालाचा वर्षभर काय आनंद साजरा करायचा तो करा. वर्षानंतर मोदी साहेबांची लाट कशी असते हे पुन्हा तुम्हाला दिसेल”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-