Deepak Kesarkar | “संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते”; दीपक केसरकरांचा मिश्किल टोला 

Deepak Kesarkar | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशातच एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याचं केसरकर म्हणाले आहेत.

“बाळासाहेबांच्या विचारापासून सर्व शिवसैनिकांना दूर नेण्याचा मोठा वाटा संजय राऊतांचा आहे. मुळात राऊत हे शिवसेनेचे नाही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. कारण ते नेहमी राष्ट्रवादीचे गुणगान गात असतात. त्यांच्यामुळेच शिवसेना फुटली हे आम्हाला नेहमीच वाटतं. संजय राऊत यांनी शिवसेनेला हिंदुत्वाच्या विचारापासून लांब नेलंय. त्यांनी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलाय”, असं म्हणत दीपक केसरकर  संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे आणि सी व्होटर’नं (india today c voter survey) केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये सत्ताधारी भाजप  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारला धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व्हेबद्दल बोलताना तो विश्वासार्ह नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्याविरोधात आहे, त्यामुळे तो त्यांना नको आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर दीपक केसरकर यांनी बोचरी टीका केली आहे.

“मूळात ते आमच्या मतावर निवडून राज्यभेत गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना थोडी जरी  नैतिकतेची जाणीव असेल, तर आम्हाला आव्हान देण्याऐवजी त्यांनी राज्यसभेच्या आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं. छोटीशीच तर निवडणूक असते, फक्त आमदाराच मतदान करणार आहेत, तेवढा तरी एकदा त्यांनी प्रयोग करून बघावा,” असं आव्हान दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :