Deepak Kesarkar | ‘50 खोके एकदम ओक्के’ म्हणून डिवचणाऱ्या ठाकरे गटावर दीपक केसरकरांचा हल्ला
मुंबई : अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीवरून सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसून येतं आहेत. पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळेच काल अर्ज सादर करण्याच्या निमित्ताने दोन्ही बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं गेलं. भाजपाचे उमेवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटातील महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. त्यावेळी उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी ‘गद्दार, 50 खोके एकदम ओक्के’ अशी घोषणाबाजी केली. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर ?
दीपक केसरकर दादर येथील स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले असताना त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरे गटाने केलेल्या घोषणाबाजीवर नाराजी व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी दोन दिवसांत ‘कोण खोके घेतं’ याचा खुलासा करणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरे गटाला दिला आहे.
आज राज्यात ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत किंवा घोषणाबाजी केली जात आहे, ती योग्य नाही. ही महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती नाही. काल मी अंधेरी पोटविडणुकीसाठी अर्ज भरायला गेलो असताना ज्याप्रकारे वर्तन केलं गेलं, ते अतिशय दुर्देवी होती. अशी घोषणाबाजी करून राज्याचा विकास होत नाही. महाराष्ट्राचा विकास कसा करायचा हे आम्ही आमच्या कामाने दाखवून देऊ
तसेच, दसरा मेळाव्याप्रमाणेच ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरून ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, हा सर्व प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे. प्रत्येक वेळी आमच्यावर सत्तेचा दुरुपयोग करतो, हे आरोप लावणं चुकीचं आहे. जर आता ठाण्यात दिवाळी पहाटचे दोन कार्यक्रम होत असतील, तर ते शांततेत पार पडायला हवे.
महत्वाच्या बातम्या :
- Diwali 2022 | दिवाळीच्या दिवशी आकर्षक दिसण्यासाठी ‘हे’ कलर कॉम्बिनेशन करा आपल्या जोडीदारासोबत
- Deepak Kesarkar | “दोन दिवसांनंतर अवघ्या महाराष्ट्राला समजेल की खोके कोणी घेतले अन्…”, दीपक केसरकरांचा इशारा
- Chandrkant Patil | “शिंदे गटातील काही आमदार नाराज”; अजित पवारांच्या विधानाला चंद्रकात पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- Nilesh Rane | भास्कर जाधव बिनकामाचा बैल तर जयंत पाटलांचा हवेत गोळीबार – निलेश राणेंची टीकेची तोफ
- ओ वाचवा…वाचवा..! ड्रायव्हर त्रास देतोय ! पुण्यात बसमध्ये प्रवाशाचा गोंधळ ; VIDEO व्हायरल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.