दिपक पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र

जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्लांची धमाकेदार कामगिरी सुरु आहे. भारताच्या दिपक पुनियाने शनिवारी 86 किलो वजनी गटात उपांत्यफेरी गाठत कोटा मिळवला.
दिपक पुनियाने 86 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व सामन्यात कोलंबियाच्या कार्लोस मेंडेज याला 7-6 असे पराभूत करत उपांत्यफेरीत धडक मारली. या लढतीत कोलंबियाच्या मल्लाने आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या ब्रेकमध्ये दिपक 0-3 फरकाने पिछाडीवर होता. अखेरच्या क्षणी त्याने बाजी मारत सामना आपल्या नावे केला. विशेष म्हणजे अखेरच्या 30 सेकंदात त्याने सामन्याला कलाटणी दिली. उपांत्यफेरीत त्याची लढत स्वित्झर्लंडच्या स्टेफन रेजमुथ याच्याविरुद्ध होणार आहे. यापूर्वी महिला गटातून विनेश फोगट (53 किलो), बजरंग पुनिया (65 किलो) आणि रवि कुमार (57 किलो) वजनी गटात टोकियोमध्य रंगणार्‍या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.