Deepali Sayyad | एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाल्या…
Deepali Sayyad | मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. सतत सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काल (शनिवार) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असल्याचं बोललं जात आहे.
काय म्हणाल्या दिपाली सय्यद (Deepali Sayyad)
ठाकरे गटाचे सध्या राज्यभर दौरे सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यभर दौरा करायला हवा होता. त्यांना भेटण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागायची. त्यांच्या बाजूची चार माणसं आमचा संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नव्हते.
पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या, काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मागील काही दिवसांपासून मी त्याच कामात होते. लवकरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येकजण आपापले काम करतो. माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. त्यामुळे मी नाराज नाही.
तसेच, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते, असेही दीपाली सय्यद यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | क्षीरसागरांना शिंदेंच्या कार्यक्रमाला जाणं भोवलं, शिवसेना पक्षाने थेट केली हकालपट्टी
- Deepali Sayyad | शिंदे गटात जाणार का? दिपाली सय्यद यांनी केलं स्पष्ट, म्हणाल्या…
- Narayan Rane | “ठाकरे गटातील चार आमदार संपर्कात”; नारायण राणेंचा दावा
- Aditya Thackeray | “आपले दोनपैकी जे कुणी खरे मुख्यमंत्री असतील…”; आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना टोला
- Skin Care Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून त्वचेवरील टॅनिंग करा दूर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.