Deepali Sayyed | चर्चा तर होणारच! दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटात प्रवेशावेळी उद्धव ठाकरे लावणार हजेरी?

Deepali Sayyed | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब लागला आहे. मात्र, शिंदे गटात प्रवेश करताना त्यांना अडचणी आल्याने त्यांच्या प्रवेशाची नवीन तारीख ठरवण्यात आली आहे. मात्र, या प्रवेशावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित असतील असं समोर येत आहे.

यादरम्यान, मी ठाकरे गटात मी मनापासून काम केलं होतं. सर्वांनी एकत्र येऊन काम करावं ही माझी इच्छा होती. पण मला हवी तशी साथ मिळाली नाही. म्हणून मी इकडे प्रवेश करणार आहे. माझं तर म्हणणं आहे की, उद्धव साहेबांनी स्वतः शिंदे गटात प्रवेश करावा, मी जबाबदारीने सांगतेय की, माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेही त्या स्टेजवर असतील, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

माझी एकच तारीख डिक्लेअर झाली होती, रविवारी माझा प्रवेश होणार होता, त्यावेळी काही अडचण आली, मग वेगळ्या पद्धतीने प्रवेश करण्याचं ठरलं, जी तारीख असेल ती जाहीर करून नंतर पक्षप्रवेश होणार आहे, असं देखील त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.