छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते इतके पैसै !

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा उद्या 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 मध्ये अभिनय क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपिकानं इथं स्वतःच्या अभिनयच्या बळावर वेगळं स्थानं निर्माण केलं. अभिनेत्रींसाठी त्यांचे सिनेमा जेवढे महत्त्वाचे असतात.

साडीत आली सोफिया रोबो

तेवढीच महत्त्वाची त्यांची स्टाइल आणि ड्रेसिंग असतं. ज्यासाठी हे स्टार लाखो करोडो खर्च करत असतात. लुक्समध्ये आउटफिट्स पासून ते एक्सेसरीज पर्यंत सर्व काही ब्राँडेड आणि हटके असावं याकडे त्यांचा भर असतो. सेलिब्रेटींच्या बॅग बद्दल बोलायचं तर त्यांच्यात महागड्या आणि स्टायलिश बॅगची स्पर्धाच लागलेली असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

आलिया-करिना यांच्यानंतर आता अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा तिच्या बॅगच्या किंमतीमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दीपिकाला बंगळुरू एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती कॅज्युअल लुकमध्ये दिसली. यावेळी तिनं व्हाइट स्वेट शर्ट आणि ट्राऊझर घातली होती. यासोबतच तिनं ब्लॅक सनग्लासेस आणि ब्राउन शूज कॅरी केले होते. मात्र या सगळ्यात दीपिकाच्या बॅगनं सर्वांचं लक्ष वेधलं.

‘या’ कारणासाठी सनी लियोनला आवडतो धोनी !

एअरपोर्ट लुक कम्प्लिट करण्यासाठी दीपिकानं शूजला मॅचिंग बॅग घेतली होती. या ब्राउन बॅगची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खास करून या बॅगच्या किंमतीचीच चर्चा सर्वत्र होत आहे.एअरपोर्टवर दीपिकानं कॅरी केलेली ही बॅग लुई वितोंची ट्रॅव्हलर बॅग होती. ज्याची किंमत जवळपास 1 लाख 22 हजार 860 रुपये असल्याचं बोललं जात आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.