InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ सिनेमा टॅक्स फ्री

दीपिका पदुकोण स्टारर ‘छपाक’ सिनेमा उद्या १० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मात्र, त्याआधी तो वादात अडकला होता. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका नंतर मागे घेण्यात आली.  आता ‘छपाक’ सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्य सरकारने तशी घोषणाच केली.

‘छपाक’ या सिनेमावर अनेक संकटे आली आहेत. तरीही हा सिनेमा उद्या प्रदर्शित होत आहे. मध्य प्रदेशमधील सरकारने हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे यावर आता करमणूक कर नसणार आहे. दरम्यान, हा सिनेमा भ्याड अॅसिड हल्ल्यावर साकारला आहे. शुक्रवारी देशभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Loading...

मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडितेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. विक्रांत मेसी आणि दिपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत.

- Advertisement -

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.