रणवीरसोबत चित्रपट न करण्याचे दीपिकाने सांगितले कारण

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी चित्रपटा इतकीच रिअल लाइफमध्ये चाहत्यांना भुरळ घातली आहे. दीपवीरला चित्रपटापासून ते रिअल लाइफमध्ये एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पदुकोण-रणवीरच्या लग्नाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांनी वेडिंग अॅनिवरसरी साजरी केली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. रणवीर सोबत चित्रपट न करण्याचा निर्णय दीपिकाने घेतल्यानं चाहत्यांना आता ही गोड जोडी सिनेमात एकत्र काम करताना दिसणार नाही.

रिअल लाइफमधली माझी आणि रणवीरमधील केमेस्ट्री मला सिनेमातून एक्सपोज करायची नाही. त्यामुळे आम्ही एकत्र सलग तीन सिनेमांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे.दीपिका आणि रणवीर सिंह यांनी एकत्र बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या जोडीमुळे आणि कामामुळे चाहत्यांनी अक्षरश: सिनेमा डोक्यावर घेतला. ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, बाजीराव ‘मस्‍तानी’ आणि ‘पद्मावत’ चित्रपटात दोघांमधील केमेस्ट्रीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांची भूमिका आणि रोमान्स प्रेक्षकांना चित्रपटातून जास्त आवडतो. त्यामुळे त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकही आतूर असतात.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.