InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

तिवरे धरण: दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – नवाब मलिक

- Advertisement -

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेतील संबंधित दोषी अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनेवर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

चिपळूणमधील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या २४ पैकी ११ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून अद्याप १३ जणांचा शोध लागू शकलेला नाही. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध व मदतकार्य सुरू आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिवरे धरण फुटून हाहाकार माजला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सात गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले. या दुर्घटनेत तिवरेतील भेंडेवाडीला मोठा तडाखा बसला आहे. जे ग्रामस्थ बेपत्ता आहेत ते सर्व याच वाडीतील आहेत.

- Advertisement -

या घटेनरनंतर राज्यातून तसेच विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर जोरदार टीकाकारण होत आहे. तसेच सरकारवर गुणही दाखल करा अशीही मागणी केली जात आहे

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.