InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात सुविधांपासून रूग्ण वंचित

- Advertisement -

रुग्णलायातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पिपंरी चिंचवड येथील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना इंजेक्शन देताना चक्क जमिनीवर झोपून दिलं जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या देहरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयामध्ये लहान मुलांना लसीकरण दिले जात आहे मात्र ते बेड वर न देता या चिमुरड्यांना चक्क जमिनीवर फक्त एक चादर टाकून इंजेक्शन्स दिले जात आहे. हा संपूर्ण प्रकार विडिओ कॅमेरा मध्ये कैद झाल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली.सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारीच जर चिमुरड्यांची अशी हेडसांड करायला लागले तर नागरिकांचा डॉक्टरावरील विश्वास उडेल.

- Advertisement -

मनसे देहुरोड शहर अध्यक्ष जॉर्ज दास यांनी याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोमेंट रुग्णालयाच्या वैधकीय अधिकारी डॉ यामिणी अडबे यांच्याकडे याबाबत तक्रार केली.संबधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या एकूणच प्रकारात फक्त डॉक्टर, कर्मचारीच दोषी नसून सोयीसुविधा उपलब्ध करून न दिलेल्या पालिका प्रशासनही तेवढ्याच प्रमाणात दोषी आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरी पालिका प्रशासन बेडसारख्या बेसिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणार का? हा प्रश्न सरकारी रूग्णालयांच्या बाबतीत उपस्थित होतो.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.