भाजपला दिल्लीत झटका; विद्यमान खासदाराने केला थेट काँग्रेसमध्ये प्रवेश

- Advertisement -
भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उदित राज नाराज झाले असून त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपाने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नाही. पण भाजपाने मला पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले असून मी अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी मंगळवारी म्हटले होते. अखेर बुधवारी सकाळी उदित राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Loading...
Related Posts
- Advertisement -
दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही उदित राज यांनी विचारला आहे. उदित राज हे दलित समाजातील नेते असून काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी देखील उदित राज यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले आहे.
Loading...
महत्त्वाच्या बातम्या –
- ममतादीदी दरवर्षी मला एक-दोन कुर्ते व मिठाई आवर्जून पाठवतात- मोदी
- कॅप्टननेच माघार घेतल्यावर, पोरं काय खेळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पवारांना टोला
- …..म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी घड्याळ उलटं घालतात
- पुणेकरांना पुढील १०० वर्षे सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न पडणार नाही, अशी मेट्रो उभारण्यात येत आहे – गिरीश बापट