Delhi Capitals | अखेर दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
Delhi Capitals | टीम महाराष्ट्र देशा: दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) ला अपघातामुळे आयपीएल 2023 (IPL 2023) मधून बाहेर पडावे लागले आहे. पंतनंतर संघाचे नेतृत्व कोण करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2023 साठी आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी डेव्हिड वॉर्नर (David Warner) संघाचे नेतृत्व करणार आहे. तर अक्षर पटेल (Akshar Patel) संघाचे उपकर्णधार पद सांभाळणार आहे.
डेव्हिड वॉर्नरने यापूर्वी आयपीएलमध्ये (IPL) सनरायझर्स हैदराबादचे कर्णधार पद सांभाळले आहे. 2022 मध्ये डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला. त्यानंतर आता यावर्षी तो संघाचे कर्णधार पद भूषवणार आहे. आयपीएल हंगामामध्ये डेव्हिड वॉर्नरने उत्तम कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने 432 धावा आपल्या नावावर केल्या आहे.
आयपीएल 2008 ते 2013 पर्यंत डेव्हिड वॉर्नर दिल्ली फ्रेंचाईजीचा भाग होता. तर 2019 पासून अक्षर पटेल दिल्ली फ्रेंचायसीचा भाग आहे. अक्षर पटेलने आयपीएलमध्ये त्याच्या बॉल आणि बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.1 एप्रिल 2023 रोजी दिल्ली कॅपिटल्स लखनऊ येथे या हंगामातील पहिला आयपीएल सामना खेळणार आहे.
आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्स संघ (Delhi Capitals Squad for IPL 2023)
यावर्षी दिल्ली कॅपिटल्समध्ये डेव्हिड वॉर्नर, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, मनीष पांडे, फिलिप सॉल्ट, रायली रुसो, रिपल पटेल, रोवमन पॉवेल, सरफराज खान, यश धुल, मिचेल मार्श, ललित यादव, एनरिच नॉर्टजे, चेतन साकारिया, कमलेश नागरकोटी , खलील अहमद, लुंगी एन्गिडी, मुस्तफिजुर रहमान, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा, मुकेश कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Weather Update | राज्यात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
- Coconut Water | नारळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Lemon Water | दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या ‘या’ समस्या होतील दूर
Comments are closed.