Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

Delhi Crime| दिल्ली : दिल्लीतील शाहबाद डेअरी (Shabad Dairy) या परिसरातून एक धक्कादायक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी एका मुलीची भररस्त्यात चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. त्या मुलीचे नाव साक्षी (Sakshi) असून तिचा प्रियकर साहिल (Sahil) आहे. त्याने 16 वर्षीय साक्षीवर 40 पेक्षा जास्त चाकूने वार केले. त्यानंतर देखील तो थांबला नाही पुन्हा त्याने तिचे डोके दगडाने ठेचण्यात सुरुवात केली.

अल्पवयीन साक्षीवर चाकूने वार करत दगडानं ठेचलं

तसचं हा प्रकार सुरू असताना आजूबाजूने अनेक लोक जात होते. परंतु, कोणीही त्याला थांबण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने साक्षीची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणाहून पळ काढला.  ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी (Delhi Police) त्यांचा लगेच शोध घेण्यास सुरुवात केली.

https://twitter.com/Tanu_Priyaaa/status/1663100428421312512

Sakshi Murder Case-

ही घटना घडत होती तेव्हा आजूबाजूला अनेक लोक उपस्थित होते. कोणीही तिला वाचवायला आलं नाही. या सर्व प्रकारामुळे दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. तर आता आलेल्या माहितीनुसार अल्पवेळात साहिलला दिल्ली पोलिसांनी पकडलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. यावर आता प्रतिक्रिया येत आहेत की, त्याचा विरोधात सगळे पुरावे आहेत यामुळे सरळ त्याचा एन्काऊंटर करा.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/sakshi-murder-accused-sahil-arrested-from-delhi-police/?feed_id=40291&_unique_id=64748d9e87c0f