‘काही काम नसेल तर घरी जेवायला या’, शीला दीक्षित यांचे केजरीवालांना आमंत्रण

दिल्लीत आज 7 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्याआधीच दिल्लीच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटरवार पाहायला मिळाले.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट जेवणाचेच आमंत्रण दिले आहे. शीला दिक्षित यांनी ट्विट केले की, माझ्या प्रकृतीसंदर्भात अफवार का पसरवताय. जर काही काम नसेल तर घरी जेवायला या. त्या निमित्ताने माझी प्रकृती कशी आहे ते देखील पाहता येईल. अफवा न पसरवता निवडणूक लढण्यास शिका असे ट्विट दीक्षित यांनी केले.

यावर अरविंद केजरीवाल यांनी देखील यावर उत्तर देत, मी तुमच्या प्रकृती संदर्भात कधी बोललो? माझ्या कुटुंबियांनी मला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यास शिकवले आहे.,असे उत्तर दिले.

महत्त्वाच्या बातम्या –

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.