जाणिवपूर्वक स्वत: असंवैधानिक कृती करायची आणि मग राज्यपालांवर टीका करायची; देवेंद्र फडणवीस संतापले

नागपुर : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या अभिभाषणाला सुरवात केली तेव्हा सभागृहात सत्ताधारी सदस्यांनी राज्यपालांचा निषेध केला. “शिवाजी महाराज की’ अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. राज्यपालांना राष्ट्रगीतासाठी दोन वेळेस माईकवरून आमदारांना विनंती केली.

यानंतर राष्ट्रगीतानंतर त्यांनी अभिभाषणास सुरवात केली. तेव्हा पुन्हा घोषणाबाजी सुरु झाली. कोश्यारी यांनी दोन वाक्य पूर्ण करुन आपले भाषण संपवलं. ते फाईल बंद करुन राजभवनाच्या दिशेला निघून गेले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत आघाडी सरकारवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यावर बोलताना म्हणाले कि, जाणिवपूर्वक स्वत: असंवैधानिक कृती करायची आणि मग राज्यपालांवर टीका करायची, त्यांना अपमानित करायचे, टार्गेट करायचे आणि तसा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रकार अयोग्य, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी महाविकासाघडी सरकारवर नाराजी देखील व्यक्त केली. ते नागपुरात मध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या