InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पूस जमीन प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा करण्याची मागणी

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

धनंजय मुंडे यांनी पूस गावातील शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून जमीन व्यवहारात फसवणू केली, असा आरोप करत मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं सहकुटुंब धरणे आंदोलन सुरू आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे नियोजित जगमित्र शुगर मिलसाठी चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर जमीन ही देवस्थानची असल्याचा दावा वादीतर्फे करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी करताना औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाविरुद्ध धनंजय मुंडे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्या ठिकाणी या प्रकरणावर काही दिवसांपूर्वी सुनावणी झाली. तरी पोलिसांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही पूर्ण केली.

महत्वाच्या बातम्या –

- Advertisement -

काँग्रेसचे आमदार आनंद सिंह यांचा राजीनामा

 बोदड येथे ट्रक घुसला घरात; गावकऱ्यांचा रास्ता रोको

विजय शंकर वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार – सूत्रांची माहिती

जालना जिल्ह्यातील वाटूर गावात साकारणार विठ्ठलाची 51 फुटांची मूर्ती

प्रतिकूल विचारसरणी असायला पाहिजे ; रवीना टंडनचा झायराला टोला

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.