भाजपच्या संकल्पपत्रात फुले-सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचं संकल्पपत्र जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याशिवाय संकल्प पत्रात १ कोटी रोजगार, २०२२ पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं शुद्ध पाणी, शेतकऱ्यांना १२ तास वीज अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. येत्या ५ वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं ध्येय असल्याचं या संकल्पपत्रात मांडण्यात आलं आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

– येत्या ५ वर्षात १ कोटी रोजगार उपलब्ध करणार

Loading...

– ५ वर्षात शेतीला लागणाऱ्या वीज सौर उर्जेवर देऊन १२ तास वीज देणार

– २०२२ पर्यंत प्रत्येक घरात शुद्ध पाणी

– मुलभूत सेवेसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

– ५ वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार

– कोकणातील १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा विषय, पूर्व विदर्भातील पाणी पश्चिम विदर्भात आणणार, पुरात वाहून जाणारे पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागासाठी वापरणार

– भारत नेट आणि महाराष्ट्र नेटच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला इंटरनेटने जोडणार

– शिवरायांचे स्मारक, बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण करणार

– ३० हजार किमीचे रस्ते बनवणार

– १६७ टीएमसी पाणी दुष्काळी भागात नेणार

– मराठवाड्यात वॉटर ग्रीड राबवणार

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.