InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुण्यात डेंग्यूचे थैमान…!

पुणे- पुणे शहरात यावर्षी डेंग्यूचे 214 पॉझिटिव्ह रुग्ण, तर डेंग्यूसदृश 1,214 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात ऑगस्ट महिन्यातच डेंग्यूचे 78, तर डेंग्यूसदृश 450 रुग्ण आढळले. आतापर्यंत दोन जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला. जून महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत असून, जूनमध्ये 181, जुलैत 455 रुग्ण आढळून आले आहेत. वास्तविक, डेंग्यूचे डास हे अस्वच्छ पाण्याचे होतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असल्यानं त्यात सोसायट्या आघाडीवर आहेत. ही बाब एका पाहणीतून समोर आली आहे. महापालिकेनं केलेल्या पाहणीत पुणे शहरातल्या तब्बल 2 हजार 849 सोसायट्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं निष्पन्न झालंय.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply