InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विजय मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. मल्ल्याने न्यायालयात सरकारी यंत्रणांकडून संपत्ती जप्तीची सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे.

आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. सरकारी यंत्रणांकडून संपत्ती जप्तीची सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी त्याने केली होती.

भारतातील बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून फरार झालेल्या मद्यसम्राट मल्ल्याला लंडनच्या न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. भारतात प्रत्यर्पण करण्याविरोधात त्याने केलेली याचिका न्यायालयाने स्वीकारली होती.

विजय मल्ल्यावर भारतातील बँकांची ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मल्ल्या २०१६ मध्ये भारतसोडून पळून गेला होता. भारताने इंग्लंडकडे त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या मल्ल्या जामीनावर बाहेर असला तरी, त्याचे प्रत्यर्पण अंतिम टप्प्यात आल्याचे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply