‘वायू’चा ‘यु टर्न’, गुजरातला न जाता समुद्राच्या दिशेने प्रस्थान

तीव्र गतीने गुजरातच्या दिशेने झेपावणाऱ्या वायू चक्रीवादळाने आपली दिशा बदलली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर न धडकता समुद्राच्या दिशेने वळले आहे. भारतीय हवामान विभागाने ही दिलासा देणारी माहिती दिली आहे.

दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यापासून संरक्षण व्हावे या दृष्टीने गुजरात सरकारने पूर्वतयारी केली असून, सुमारे ३ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ पोरबंदर आणि द्वारका किनाऱ्यापट्टीच्या भागातून यू टर्न घेणार आहे वळणार आहे. चक्रीवादळ माघारी फिरताना गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा परिणाम जाणवणार असून मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.