Detoxification | उन्हाळ्यामध्ये बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Detoxification | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये पोट थंड ठेवण्यासोबतच पोट डिटॉक्स (Detox) करणे खूप महत्त्वाचे असते. शरीर डिटॉक्स केल्याने शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर निघतात आणि शरीर निरोगी राहते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती पद्धती वापरू शकतात.

ग्रीन टी (Green Tea For Detoxification)

ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. त्याचबरोबर नियमित ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ग्रीन टीचे सेवन करणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

लिंबू (Lemon For Detoxification)

लिंबामध्ये आढळणारे विटामिन सी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर लिंबामध्ये फायबर, सोडियम, पोटॅशियम, आयरन घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. लिंबाचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि शरीर डिटॉक्स होते. याच्या सेवनाने तुम्ही अपचन, गॅस इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात.

टरबूज (Watermelon For Detoxification)

उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी टरबुजाचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते. टरबूज खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते. टरबुजामध्ये आढळणारे गुणधर्म शरीर डिटॉक्स करण्यात मदत करतात.

उन्हाळ्यामध्ये शरीराला डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही वरील घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांना ब्राह्मी तेल लावल्याने खालील फायदे मिळतात.

केसांना पोषण मिळते (Hair is nourished-Brahmi Oil Benefits)

उन्हाळ्यामध्ये केस कोरडे आणि निर्जीव होतात. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही ब्राह्मी तेलाचा वापर करू शकतात. ब्राह्मी तेलामध्ये आढळणारे फॅटी ॲसिड आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म केसांना पोषण प्रदान करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या तेलाचा वापर केल्याने केस चमकदार आणि मऊ होऊ शकतात.

केसांच्या वाढीस चालना मिळते (Promotes hair growth-Brahmi Oil Benefits)

नियमित ब्राह्मी तेलाचा वापर केल्याने केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या कूपांना पोषण प्रदान करतात. यासाठी तुम्हाला ब्राह्मी तेलाच्या मदतीने टाळूला मसाज करावी लागेल. याच्या नियमित वापराने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळतीची समस्या दूर होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या