‘इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते’; भरणेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी ‘भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून शांत झोप लागते, कुठली चौकशीही नाही’, असं वक्तव्य केलं होतं. यावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना जोरदार निशाणा साधला आहे.

‘इंदापूर तालुक्यात विकासकामं केल्यामुळे मला शांत झोप लागते’, अशा शब्दात भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलाय. भरणेंच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलीच चर्चा पाहायला मिळाली.

मला विधानसभेला तिकीट नाकारण्यात आलं म्हणून मी भाजपमध्ये गेलो. हा माझा राजकीय निर्णय आहे. माझ्या कुठल्याही चौकशीचा व माझ्या भाजप प्रवेशाचा काही एक संबंध नाही. विधानसभेला मला तिकीट देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो पाळला गेला नाही. त्यामुळेच मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा