InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

विकासकामे करून दाखवावी लागतात ती फेकाफेकी करून होत नसतात – जयदत्त क्षीरसागर

- Advertisement -

बाजारात आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजूने विचार करून खरेदी करतो. तसेच मतदान करताना देखील चौकस बुद्धी ठेऊन मतदान करावे लागते. विकासकामे करून दाखवावी लागतात. ती बोलल्याने किंवा फेकाफेकी केल्याने होत नसतात. बीड मतदारसंघातील जनतेवर माझा विश्वास आहे. नेहमीच मी त्यांचा आदर केला आहे. या जनतेला विकास हवा आहे. आणि विकासाची भूक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, डोंगरपट्ट्यातील बोरफडी या गावातील ग्रामस्थांनी जेव्हा जेव्हा विकासाच्या कामाची मागणी आणि हट्ट धरला. तेव्हा तेव्हा त्यांच्या या विकासाच्या मागणीला प्राधान्य देण्याचे काम आपण केले. शिक्षण, आरोग्य आणि डोंगरी भागाचा जो विकास असतो तो विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम आपण केले. जे खाते मला मिळाले त्या खात्याच्या माध्यमातून जनतेला आणि शेतकर्‍यांना फायदा मिळवून देण्याचे काम आपण केले. या भागातील जनतेचा आपण नेहमीच आदर केला आहे. या निवडणुकीत आपल्याला संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याचे काम आपण करू. या भागातील ऊसतोड मजूर हातात कोयता घेऊन जीवन जगतो. तो कोयता घेणारा शेतकरी बागायतदार झाला पाहिजे. विकासकामे जलदगतीने करायची असतील तर सोंगंढोंगं करणार्‍यांना बाजूला सारा, गट तट विसरून धनुष्यबाणाला मतदान करा, विकास बोलून होत नाही तो करून दाखवावा लागतो असे त्यांनी आवर्जुन सांगितले.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.