InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

विकास हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा – विनय सहस्त्रबुध्दे

विकास हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

सहस्त्रबुध्दे म्हणाले की,  विकास हाच भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असून, गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीच्या आधारावर जनादेश मागत आहोत. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता, जबाबदारीचे भान, परिणामकारक शासनाचा अनुभव, योजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षण, सामाजिक न्याय व नागरिकांमधील समन्वय यामुळे महायुतीला भक्कम जनादेश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट, महापौर मुक्त टिळक आणि उपमहपौर सिध्दार्थ धेंडे देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.